या गणपती बाप्पांच्या नावामागे दडलंय काय

www.puneganeshfestival.com च्या माध्यमातून प्रसिद्ध-अप्रसिद्ध गणपती मंदिर आम्ही आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो, या सिरीज मध्ये चित्र-विचित्र नाव असलेले गणपती बाप्पा आम्ही आपल्यापर्यंत पोहचवणार आहोत,आवडल्यास हि माहिती शेर करा आपले बाप्पा जगामध्ये पोहचवण्यास मदत करा !

1.मोदकेश्वर गणपती, नाशिक

भारतातील २१ वरदविनायकांपैकी एक स्वयंभू गणेश मंदिर नाशिकच्या गंगाघाटावर आहे. मोदकेश्वर मंदिर या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे. गेल्या ८ पिढ्यांपासून क्षेमकल्याणी कुटुंबीय मंदिराची व्यवस्था पाहत आहेत.
श्री मोदकेश्वर गणपती मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर पूर्वाभिमुख असलेले स्वयंभू, जागृत आणि अति पुरातन मंदिर आहे. श्री मोदकेश्वर गणरायाच्या मंदिराचा मूळ गाभारा चार खांबांचा आहे. त्यात शेंदूर विलेपित मूर्ती अतिशय प्रमाणबध्द, आकर्षक रूपात स्थित आहे. प्रातःकालची कोवळी किरणे नेमकी श्री मोदकेश्वराच्या चरणावर पडतात. त्यावेळची शोभा अवर्णनीय अशीच आहे. मंदिरात दररोज सकाळी महापूजा आरती केली जाते. गणेश जयंती, गणेशोत्सव या दिवसात अतिशय आकर्षक अशी ही मूर्ती यावेळी भाविकांची नजर खिळवून ठेवते. मंदिराभोवतीची विद्युत रोषणाई व मूर्तीची आकर्षक सजावट बघण्यासाठी गणेश भक्तांची मोठी रांग लागलेली असते. त्याचबरोबर पर्जन्यवृष्टीसाठी करण्यात येणारे गणेश याग, सहस्त्रावर्तने, या कार्यक्रमातही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.अतिशय पुरातन अशा या मंदिरात श्री मोदकेश्वर गणपतीच्या मागील बाजूस रिध्दी व सिध्दी या दोन देवींच्या मूर्ती आहेत. तसेच मंदिराला लागूनच एक काशी विश्वेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्यामुळे पिता-पुत्र एवढे निकट सान्निध्य इतर मंदिरात सहसा आढळत नाही. तसेच बाहेरील प्रशस्त गणेश मठात श्री सत्यनारायण, राम, तसेच विठ्ठल मूर्ती आहेत. मंदिराचा मठ व त्यावर तीन मजली बांधकाम आहे. हे अतिशय पुरातन व रेखीव असल्या कारणाने त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता पुजार्‍यांनी त्यात सुधारणा केल्या आहेत.गणेशाची ही प्राचीन मूर्ती मोदकाच्या आकाराची आहे ती पाषाणाची आहे ,म्हणून या बाप्पाला मोदकेश्वर म्हणतात. (संदर्भ - दै.लोकसत्ता )

पुण्यात देखील माती गणपती,मोदी गणपती अशी वेगवेगळी नावे असणारी गणपती मंदिर आहेत,का पडलियेत हि नावे जाणून घेण्याची मोफत संधी !

अप्पा बळवंत चौकातले अप्पा बळवंत म्हणजे नेमके कोण ??

पुण्यात दत्ताची मंदिरं अनेक...पण पुण्यातल्या कोणत्या दत्ताला दाढी आहे आणि त्यामागची अख्यायिका कोणती ??

मुरलीधर असणारा श्रीकृष्ण "खुन्या" मुरलीधर कसा झाला ??

पुण्यातल्या पेठांना नावं कशी पडली ??

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला येतोय आपलाच एक अभ्यासू मित्र आणि "ह्या नावामागे दडलंय काय ??" ह्या पुस्तकाचा लेखक सुप्रसाद पुराणिक. त्यामुळे काहीही झालं तरी हा कट्टा चुकवू नका. कट्टयाचे डिटेल्स खालीलप्रमाणे

पुणे भटकंती कट्टा - फेब्रुवारी 2020

विषय: ह्या नावांमागे दडलंय काय ??
पुणे शहरातल्या विविध ठिकाणांच्या नावामागचे भन्नाट किस्से,इतिहास आणि आख्यायिका सांगणारा आगळावेगळा कट्टा !!

वक्ता : सुप्रसाद पुराणिक

दिनांक: शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

वेळ: सायंकाळी ७ ते कट्टा संपेपर्यंत

ठिकाण: इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे ब्रिजजवळ, राजेंद्र नगर, पुणे 30.

प्रवेश : अर्थातच विनामूल्य !!

Tags :