पुणे गणेश फेस्टीवल डॉट कॉम व फिरस्ती महाराष्ट्राची आयोजित 10 दिवस 10 गणपती हेरिटेज वॉक ला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

पुण्यास एक खुप मोठा  सांस्कृतिक आणि एतिहासीक वरसा लाभला आहे. . १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यातही पुण्याचा पारंपारिक गणेशोत्सव विशेष प्रसिध्द झालाफक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. शहरात प्राचीन काळातील अनेक गणेश मंदीर आणि हेरिटेज ठिकाणे आहेत त्यांचा इतिहास माहिती लोकांपर्यंत पोह्चावी म्हणून पुणे गणेश फेस्टीवल डॉट कॉम  फिरस्ती महाराष्ट्राची या दोन्ही संस्थांनी एकत्र येवुन 10दिवस 10 हेरिटेज वॉक चे आयोजन केले आहे त्याला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

याबाबत माहिती देताना संस्थेचे स्वप्नील नहार म्हणाले पुण्यातील गणेश उत्सवाचे विविध पैलू जगभरात पोहोचवण्यासाठी ''संकल्प डिझाइन्स'' संस्थेने www.puneganeshfestival.com  हे संकेतस्थळ बनवले आहे.त्याचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती मा.नीलम गोर्हे यांनी केले.या बरोबरच अम्ही यंदा एक सामजिक उपक्रम घेतला आहे तो म्हणजे 10 दिवस 10गणपती हेरिटेज वॉक ते ही मोफत, पुण्यात अनेक प्राचीन गणेश मंदीर आहेत ती पुणेकरांना समजली तर आपला गणेश उत्सव निश्चीत जगात पोहचवणं सोप जाईल.

याबाबत माहिती देताना अनुराग वैद्य म्हणाले आपला इतिहासीक वरसा जगात पोहचवने हा आमचा उद्देश्य असुन लोकांचा या कल्पनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.पुण्यातील हेरिटेज वारसा आम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवत आहोत.

मंदार ,गुपचुप ,उंब्रया ,पावसकर,मूंजोबा असे ओफ्बिट गणपती अम्ही जेव्हा लोकाना दाखवतो तेव्हा त्याना अशी नाव का पडली हा प्रश्न पडतो,त्यासाठी आम्ही  लवकरच एक पुस्तक काढणार आहोत ही माहिती सुप्रसाद पुराणिक यानी दिली.

Tags :