शाडूच्या मातीपासून घरीच घडवा लाडक्या बाप्पाची मूर्ती


हा आमच्या घरचा पगडी घातलेला हँडमेड -eco गणपती... मूर्ती डोळस साजिरी..
हा आमच्या घरचा पगडी घातलेला हँडमेड -eco गणपती... मूर्ती डोळस साजिरी..
हा आमच्या घरचा पगडी घातलेला हँडमेड -eco गणपती... मूर्ती डोळस साजिरी..
हा आमच्या घरचा पगडी घातलेला हँडमेड -eco गणपती... मूर्ती डोळस साजिरी..
बाप्पा,पगडी मस्तं दिसतेय.
उंदीरमामा - बाप्पाला मोदकाचा आग्रह करताना...........
सर्वात आधी विकत आणलेली शाडू माती चांगल्या पद्धतीने भिजवून घ्यावी. ती अधिक घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
आधी मूर्तीचा खालचा भाग तयार करण्यास सुरुवात करा. म्हणजेच श्रीगणेशाचे पाय किंवा आसन तयार करायचे असल्यास ते आधी तयार करावे.
आता शरीराचा भाग किंवा धड तयार करण्यासाठी साधारण इंग्रजी टी आकाराचा एक गोळा तयार करून घ्यावा व तो पाठ आणि पायाच्या भागावर लावावा. हा भाग लावताना पोटाचा भाग मोठा आणि गोलाकार येइल याची काळजी घ्
डोके तयार करण्यासाठी एक गोल गोळा घेऊन तो शरीरावर लावाला. तो व्यवस्थित लावल्यानंतर एक लांब तुकडा घेऊन सोंडही त्याला लावता येईल
कान- अवजारांनी किंवा आईस्क्रीमची स्टीक अथवा लाकडी पट्टीने कोरून (घरातील चाकू किंवा बटन नाईफचाही वापर करता येऊ शकेल) आकार देता येऊ शकतो
टाक्षाने नैसर्गिक रंगांचाच वापर होईल हे लक्षात ठेवा. धोतरासाठी हळद, पितांबरासाठी अष्टगंध आणि शरीराला रंग देण्यासाठी मुलतानी माती वापरता येईल.

Information

गणरायाच्या आगमनाची चाहूल : शाडूच्या मातीपासून घरीच घडवा लाडक्या बाप्पाची मूर्ती.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्यात आली आहे. नागरिकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दिशेने सर्वात मोठे पाऊल म्हणजे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होत नसल्याने त्याचा पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवात मातीच्या किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींची स्थापना करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण या मूर्तींची किंमत अधिक असल्याने सार्वजनिक गणेश मंडळे अद्याप मातीच्या मूर्तींचा फार विचार करत नाहीत. शिवाय मातीच्या मूर्तीं तयार करण्यासाठी आकारावर बंधने येत असल्यामुळेही मंडळे मातीच्या मूर्तींना पसंती देत नाही.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांशी तुलना करता मातीच्या मूर्त्यांचे दर हे सुमारे चार ते पाच पटीने अधिक असतात. त्यामुळे अनेक जण नाइलाजाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची स्थापना करतात. पण गेल्या एक ते दोन वर्षांत यावरही एक चांगला पर्याय समोर आला आहे. तो म्हणजे गणेशाच्या स्वनिर्मित मूर्तीची स्थापना. अनेक ठिकाणी गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. त्यात गणेश मूर्ती तयार करण्यासंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. तसेच अनेक ठिकाणी मातीही उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे तुम्हाला घरच्या घरीची मूर्ती तयार करता येते.

स्वतः गणेशमूर्ती तयार करून तिची स्थापना करण्याचा आनंदच काही और असतो. आपण तयार केलेली मूर्ती व्यावसायिक कलाकाराएवढी सुबक असेलच असे नाही. पण तिच्याशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे घरीच शाडूची माती विकत आणून मूर्ती बनवण्यालाही अनेक जण प्राधान्य देतात. अशाच गणेशभक्तांसाठी शाडूच्या मातीची गणेशमूर्ती तयार करण्यासंदर्भात काही टिप्स याठिकाणी देत आहोत.

 


मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- शाडूची माती - अनेक ठिकाणी ही माती सहजपणे उपलब्ध होते. किलोच्या दरानुसार ही माती मिळते.
- माती भिजवण्यासाठी भांडे
- लाकडी पट्टी किंवा मूर्ती तयार करण्याची अवजारे. काही दुकानांमध्ये अवजारे विकतही मिळतात. त्याला Carving stics असेही म्हणतात.
- रंगकाम करण्यासाठी ब्रश.
- रंग - नैसर्गिक रंगाचाच वापर करावा, त्यासाठी हळद, मुलतानी माती, कुंकू, गुलाल याचा ावपर करूनही रंग तयार करता येतात. तसेच विकतही मिळतात. डींकाचा (फेव्हीकॉल) वापर केल्यास मूर्ती लवकर रंग पकडतात.
- मूर्ती जेवढी मोठी तयार करायची असेल (तळाचा आकार)  त्यानुसार जाड खोके.
त्याशिवाय जुने वृत्तपत्र, प्लास्टीक.